Marathi

  

DEPARTMENT OF MARATHI

Established in 1937

•·        Faculty

 1. Leena C. Kedare

      Head of the Department since June, 2007

 1. Shilpa L. Neve

      Full -time Lecturer since August, 2008

 1. Ashlesha A. Rangnekar

      C.H.B. Lecturer since June, 2006  

 • लीना केदारे 
  • प्रमुख, मराठी विभाग
  • प्रमुख, वादसभा
  • कार्याध्यक्ष, विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला
  • सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समिती
   अध्यापनाचा अनुभव  
  • पूर्णवेळ व्याख्याता म्हणून १७ वर्षे (पदवीपूर्व पातळी)
  • मानद व्याख्याता म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये १ वर्ष अनुभव (पदव्युत्तर पातळी)
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर पातळीवरील अध्यापनाचा २ वर्षांचा अनुभव
  • अमराठी भाषिकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचा ३ वर्षांचा अनुभव
   संशोधन  
  • विविध नियतकालिकांमध्ये वाङ्मयीन आणि सामाजिक प्रश्नांबाबत लेखन.
  • विविध राज्यस्तरीय आणि विद्यापीठस्तरीय चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर शोधनिबंध सादर.
  • पुकार सामाजिक प्रकल्प पूर्ण
  • शिल्पा नेवे
   • पूर्णवेळ व्याख्याता, मराठी विभाग
   • प्रमुख, मराठी वाङ्मय मंडळ
   • कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना
   • सदस्य, महिला विकास कक्ष
   अध्यापनाचा अनुभव
   • अर्धवेळ व्याख्याता ९ वर्षे (पदवीपूर्व पातळीवरील)
   • पूर्णवेळ व्याख्याता २००८ पासून (पदवीपूर्व पातळीवरील)
   संशोधन
   • विविध नियतकालिकांमध्ये लेखन प्रसिद्ध
   • पुकार सामाजिक प्रकल्प पूर्ण
   • आश्लेषा रांगणेकर
   • समन्वयक, बी.एम्.एम्.(मराठी)
   अध्यापनाचा अनुभव
   • पाच वर्षे तासिका तत्त्वावर पदवीपूर्व पातळीवरील अध्यापनाचा अनुभव.
   संशोधन
   • विविध नियतकालिकांमध्ये प्रासंगिक लेखन
   • पुकार सामाजिक प्रकल्प पूर्ण

   

  • मराठी विभाग
  •  मराठी विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 
   • मराठी विभागातर्फे पदवी पातळीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकविला जातो. (बी.ए.मराठी)
    अभ्यासक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे (कोर्स पॅटर्न)
   • श्रेयांकन पद्धती (क्रेडीट सिस्टिम)
   • सत्र पद्धती (सेमिस्टर सिस्टिम)
   • प्रत्येक सत्राच्या अखेरीस लेखी परीक्षा आणि अंतर्गत परीक्षा
   • लेखी परीक्षा ६० गुण
   • अंतर्गत परीक्षा ४० गुण
    अंतर्गत परीक्षेचे स्वरुप (४० गुण)      
  •    वर्गचाचणी १० गुण        
  •  प्रकल्प १० गुण   
  •     वर्गातील सहभाग, उपस्थिती आणि सादरीकरण १० गुण   
  •  अभ्यासक्रम
  • प्रथम वर्ष, कला (एफ.वाय.बी.ए)
   • अनिवार्य मराठी प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, संस्कृत किंवा फ्रेंच यापैकी एका भाषेची अभ्यासासाठी निवड करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी भाषाविषयाच्या अभ्यासासाठी मराठीची निवड केल्यास त्यांना पहिल्या वर्षाच्या दोन सत्रात अनिवार्य मराठी हा विषय शिकविला जातो.
   प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रम
  • कथासंग्रह (३० गुण)                        
  •  व्यावहारिक मराठी (३० गुण)       
  •  नेमलेला कथासंग्रह निवडक मराठी कथा                
  • संपादक -  डॉ.वसंत शेकडे आणि इतर        
  • व्यावहारिक मराठी लेखनविषयक नियम व विरामचिन्हे , अर्जलेखन, भाषांतर ,  वृत्त आणि वृत्तांतलेखन
  • दुसऱ्या सत्रासाठी  अभ्यासक्रम
  • कवितासंग्रह(३० गुण)                     
  • व्यावहारिक मराठी (३० गुण)       
  • नेमलेला कवितासंग्रह - कविता शतकाची                 
  •  संपादक डॉ.वसंत शेकडे आणि इतर         
  •  व्यावहारिक मराठी टिप्पणीलेखन, इतिवृत्तलेखन                              जाहिरातलेखन, सारांश लेखन 
  • ऐच्छिक मराठी
   • विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत किंवा प्रथम व द्वितीय वर्षात मराठी साहित्याचा अभ्यास करायची इच्छा असल्यास त्यांनी प्रथम वर्षात ऐच्छिक मराठी हा विषय निवडणे आवश्यक आहे.
    ऐच्छिक मराठी
  • अभ्यासपत्रिका क्रमांक १ (प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रम) 
   • नेमलेला वाङ्मयप्रकार नाटक (६० गुण)
   • नेमलेल्या नाट्यकृती नटसम्राट (३० गुण)
               नाटककार वि.वा.शिरवाडकर
  •                      - प्रेमा तुझा रंग कसा (३० गुण)                 नाटककार वसंत कानेटकर 
  •  द्वितीय सत्रासाठी अभ्यासक्रम (अभ्यासपत्रिका क्रमांक १)·         नेमलेला वाङ्मयप्रकार   ललितगद्य (६० गुण)
  • ·        नेमलेल्या साहित्यकृती मृद्-गंध(३० गुण)              
  • लेखिका इंदिरा संत                     
  •  - डोह (३० गुण)               
  •  लेखक श्रीनिवास कुलकर्णी
  • द्वितीय वर्ष, कला (एस.वाय.बी.ए.) द्वितीय वर्षातील अभ्यासपत्रिका क्रमांक २ आणि ३ (पेपर II आणि III) शिकविले जातात. 
  • अभ्यासपत्रिका क्रमांक २ चा अभ्यासक्रम
  • प्रथम सत्र
   • नेमलेला वाङ्मयप्रकार कादंबरी (६० गुण)
   • नेमलेल्या कादंबऱ्या -  गोतावळा (३० गुण)
              कादंबरीकार आनंद यादव             
  •   - रोबो (३० गुण)   
  •  कादंबरीकार दीनानाथ मनोहर 
  •  द्वितीय सत्र
   • नेमलेला वाङ्मयप्रकार प्रवासवर्णन (६० गुण)
   • नेमलेली प्रवासवर्णने  - घाट शिळेवरी उभी (३० गुण)
         लेखक रा.भि.जोशी          
  •   - तोकोनामा (३० गुण)      
  •  लेखक प्रभाकर पाध्ये
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ३ चा अभ्यासक्रम
  • प्रथम सत्र
  • भाषाविज्ञान परिचय (६० गुण)     
  •  घटकविषय  
  •  ·         मानवी भाषेचे स्वरूप, मानवी आणि मानवेतर संदेशन, मानवी भाषेची वैशिष्ट्ये, भाषेविषयीचे समज-गैरसमज (२० गुण)
  •  ·         भाषेची विविध रुपे, भाषेची कार्ये, याकोबसनचे भाषिक कार्यांचे नमुनारूप    (२० गुण)
  • ·         भाषेच्या अभ्यासाच्या पद्धती व इतर उपविषय (२० गुण)
  •  द्वितीय सत्र
  • ·         नेमलेला वाङ्मयप्रकार वैचारिक गद्य (६० गुण)
  •  ·      नेमलेली साहित्यकृती वैचारिक गद्य                       
  •  संपादक - डॉ.वसंत शेकडे आणि इतर 
  •  तृतीय वर्ष, कला ( टी.वाय.बी.ए.)
  • तृतीय वर्षात अभ्यासपत्रिका क्रमांक ४ ते ९ असे ६ विषय अभ्यासावे लागतात.           (एकूण ६०० गुण)संपूर्ण मराठी घेणाऱ्यांना सर्व ६ पेपर तर अर्धे मराठी घेणाऱ्यांना ४ ते ६ असे ३ पेपर असतात.
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ४ मराठी वाङ्मयाचा इतिहास (१०० गुण)
  • ·         कोरीवलेख
  • ·         नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, समर्थ, लिंगायत इत्यादी पंथांकडून निर्माण झालेले वाङ्मय.
  • ·         जैन, ख्रिस्ती, मुस्लिम इत्यादी धर्मीयांचे मराठी वाङ्मय.
  • ·         मध्ययुगीन मराठीतील वाङ्मयप्रकार तसेच ग्रंथ व ग्रंथकारांचा परिचय.
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ५ साहित्यशास्त्र व साहित्यसमीक्षा (१०० गुण)
  • ·         साहित्याचे स्वरूप, भाषा, प्रयोजन, निर्मितीप्रक्रिया, आस्वाद, परिणाम इत्यादी अंगांनी विचार.
  • ·         समीक्षाव्यवहाराचा तात्विक विचार.
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ६ साहित्य आणि समाज (लेखी परीक्षा ८० गुण + प्रकल्प २० गुण)
  • ·         साहित्य आणि समाज यांच्या परस्परसंबंधांचा तात्विक विचार
  • ·         ग्रामीण प्रवाहातील गावठाण ही कादंबरी (कृष्णात खोत)
  • ·         स्त्रीवादी प्रवाहातील अवकाश ही कादंबरी (सानिया)
  • ·         दलित प्रवाहातील सूड ही कादंबरी (बाबूराव बागूल)
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ७ भाषाविज्ञान परिचय आणि मराठी व्याकरणाची रूपरेषा(१०० गुण)
  • ·         मानवी भाषेचे स्वरूप आणि कार्य, भाषाभ्यासाच्या पद्धती आणि भाषाविज्ञानातील ध्वनिविचार, अर्थविचार, स्वनिम, पदिम, वाक्यविन्यास इत्यादी संकल्पनांचा विचार
  • ·         मराठी व्याकरणातील शब्दजाती, नाम-लिंग-वचन-विभक्ती इत्यादी विकरणे, प्रयोग आणि शब्दघटना या विषयांचा अभ्यास
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ८ विशेष लेखकाभ्यास (१०० गुण)
  • ·         अभ्यासासाठी नेमलेले लेखक - जयवंत दळवी        
  • नेमलेल्या साहित्यकृती
  • अंधाराच्या पारंब्या (कादंबरी)                             
  •  सारे प्रवासी घडीचे (कादंबरी)                             
  • संध्याछाया (नाटक) 
  • वेचक जयवंत दळवी (कथासंग्रह)
  • ·         तसेच लेखकाभ्यास या संकल्पनेचा तात्विक विचार
  • अभ्यासपत्रिका क्रमांक ९ भाषांतर, वाङ्मयीन निबंध आणि प्रकल्प                                                (लेखी परीक्षा ८० गुण + प्रकल्प २० गुण)
  •  ·         भाषांतर या संकल्पनेचा तात्विक विचार (३० गुण)
  • ·         इंग्रजीचे मराठीत भाषांतर (१० गुण)
  • ·         हिंदीचे मराठीत भाषांतर (१० गुण)
  • ·         प्राचीन मराठीचे अर्वाचीन मराठीत भाषांतर (१० गुण)
  • ·         दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर वाङ्मयीन निबंध (२० गुण)
  • मराठी विभागातर्फे महाविद्यालयात पुढील उपक्रम चालविले जातात.
  • ·        मराठी वाङ्मय मंडळ
  • ·        मराठी वादसभा
  • ·        प्रा.न.र.फाटक स्मृति-कार्यक्रम
  • ·        प्रा.श्री.पु.भागवत स्मृति-कार्यक्रम
  • ·        विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला
  • या उपक्रमांतर्गत गतवर्षी (२०११ २०१२) झालेले कार्यक्रममराठी वाङ्मय मंडळ
   • पटकथासंवादलेखक, गीतकार, अभिनेते गुरू ठाकूर यांची मुलाखत
   • स्वरचित कवितालेखन स्पर्धा
   • हर्षोल्हास, महाराष्ट्र उत्सव इत्यादी आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमध्ये सहभाग
   • महाराष्ट्र उत्सव मध्ये सर्वोत्कृष्ट महाविद्यालय सन्मान प्राप्त
   • विविध माध्यमे उदाहरणार्थ आकाशवाणी, दूरचित्रवाणी मध्ये विद्यार्थ्यांना संधी
   • विद्यार्थी साहित्य संमेलनात सहभाग
   • विद्यार्थ्यांसाठी वाचनालय परिचय कार्यक्रम
   • विभाग आणि मंडळातर्फे काचफलकाचा उपक्रम
   • मराठी विषयात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद
    रुईया मराठी वादसभा प्रा.गोवर्धन पारीख राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
  •  परीक्षक (२०११ २०१२) कवयित्री प्रज्ञा दया पवार    ,  श्री.भीम रास्कर (सामाजिक कार्यकर्ते).
  • राज्यभरातून सुमारे ५० विद्यार्थ्यांचा सहभाग.
  • प्रा.न.र.फाटक स्मृति-कार्यक्रम (२०११ २०१२) आई... (साने गुरूजींच्या श्यामची आई या पुस्तकाच्या आणि आपल्या महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम).
  • सादरकर्ते अभिनेते नंदू माधव, अभिनेते संदीप कुलकर्णी, कवयित्री नीरजा, पत्रकार युवराज मोहिते.
  • प्रा.श्री.पु.भागवत स्मृति-कार्यक्रम (२०११ २०१२)चित्रपट रसास्वाद कार्यशाळा. मार्गदर्शक चित्रपट समीक्षक अशोक राणे. एकूण १४८ विद्यार्थ्यांचा संपूर्ण दोन दिवस सहभाग. विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे.
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला (२०११ २०१२)उच्चशिक्षण :सद्य :स्थिती आणि आव्हाने. या सूत्राभोवती तीन जाहीर व्याख्याने.
   • २३ जानेवारी, वक्ते श्री.अरुण निगवेकर (माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ)
   • २४ जानेवारी, वक्ते श्री.द.ना.धनागरे (माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)
   • २५ जानेवारी, वक्ते डॉ.अभय वाघ(सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण खाते, महाराष्ट्र शासन)
   धन्यवाद !
 

Ruia Online

Login Form